स्वाधार योजनेमुळे मिळाला माझ्या शिक्षणाला आधार
मी सावर्डेकर दिप्ती अनिल, बी.एच.एम.एस. रत्नागिरी
जिल्हयातील रहिवासी असून मी सोलापूर
जिल्हयातील महिला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज
सोलापूर, येथे बी.एच.एम.एस. प्रथम वर्ष या अभ्यासक्रमास
प्रवेश घेतला होता. सद्यस्थितीत मी बी.एच.एम.एस. त वर्षामध्ये शिक्षण घेत असून मला
प्रत्येक शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेचा लाभ मिळाला आहे.
माझे गाव मु.पो नायशी ता.चिपळूण जि.रत्नागिरी हे असून शिक्षणासाठी मी माझ्या
जिल्ह्यापासून दूर असलेल्या सोलापूर या ठिकाणी आले आहे. मला स्वाधार योजनेमुळे
शिक्षण घेण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली असून माझ्या कुटुंबाचा आर्थिक ताण
कमी झाला आहे. यासाठी मी समाज कल्याण
विभागाची आभारी राहीन.